झोपडपट्टीचा विकास हाच आमचा खरा संकल्प – आमदार सुनील कांबळे


पुणे दि – —सबका साथ सबका विकास हे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेनुसार पुण्याचा ही विकास अतिशय गतीने होत आहे .याच सूत्रांनुसार आम्ही ही संपूर्ण मतदारसंघातील झोपडपट्टीचा विकास ,त्यांना पक्की घरे ,स्वच्छता ,शिक्षण व आरोग्य सेवा यावर वर लक्ष केंद्रित ठेऊनच कार्य करणार असल्याचे आमदार सुनील कांबळे यांनी सांगितले .नवनिर्वाचित नगरसेविका मृणाल बापूसाहेब कांबळे व माजी नगरसेवक बापूसाहेब कांबळे यांच्या संकल्पनेतून व निर्धारातून झोपडीधारकांना पक्की घरे देण्याच्या उद्देशातून आज लोहियानगर पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ पार पडला त्यावेळी आमदार कांबळे बोलत होते .
पुढे ते म्हणाले की, पुणे शहरात झोपडपट्ट्यांची संख्या जास्त आहे .तेथील नागरिकांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचे कार्य करणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले .
आमदार हेमंत रासने यांनी लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला सर्व ती शासन स्तरावर मदत करणार असल्याचा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला .तसेच बापू कांबळे यांनी अतिशय धावपळ आणि मेहनत घेऊन या प्रकल्पाची सुरुवात केली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले .
प्रास्ताविक मनोगतामध्ये माजी नगरसेवक व या प्रकल्पाचे संकल्पक बापू कांबळे यांनी हा प्रकल्प पूर्ण होणे आणि येथील माझ्या बांधवांना पक्की घरे निर्माण करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मी निर्धार केला असल्याचे सांगितले .तसेच हा प्रकल्प सुरुवात करण्यासाठी किती अडथळे पार करावे लागतात परंतु आमचे स्वप्न आणि निर्धार पक्का होता त्यामुळे सर्व सुरळीत होत आहे .असे सांगत आपले मनोगत व्यक्त केले .
यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका मृणाल कांबळे यांच्या संकल्पनेतून लोहियानगर व परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी ई सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार सुनील कांबळे व आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते करण्यात आले ,
नगरसेविका मृणाल कांबळे यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले .तसेच संपूर्ण प्रभागातील झोपडपट्टी धारकांना पक्की घरे देण्याचा आमचा संकल्प असल्याचे जाहीर केले .
या समारंभास आमदार सुनील कांबळे ,आमदार हेमंत रासने ,या समारंभाचे आयोजक माजी नगरसेवक बापू कांबळे ,नगरसेविका मृणाल कांबळे ,नगरसेवक कुणाल टिळक,सामाजिक कार्यकर्ते अनिलदादा हातागळे ,विकसक विवेक पाटील ,नगरसेवक अमर अमराळे ,भाजपाचे मतदारसंघात सचिव शंतनू कांबळे ,वैभव कांबळे ,ओबीसी आघाडीचे नामदेव माळवदे ,भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे पदाधिकारी यासह पुणे शहरातील मातंग समाजाचे कार्यकर्ते ,शहर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक रहिवासी महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

8d54875a 3016 4c11 8819 2d380132b80a 1024x683
  • Related Posts

    क्वाड्रंगुलर गोल्फ चषक पुना क्लब गोल्फ ने पटकावला

    पुणे दि —- अतिशय प्रतिष्ठित अशा क्वाड्रंगुलर गोल्फ टूर्नामेंट 2026 च्या अतीतटीच्या लढतीमध्ये ९७४ स्टेबलफोर्ड गुणांसह अव्वल स्थान पटकावीत पुना क्लब गोल्फ कोर्स ने २०२६ चा क्वांड्रांगुलर चषक पाठविला आहे…

    प्रभाग १७ बाबत कायदेशीर न्याय मिळावा- भरत वाल्हेकर

    प्रभाग क्र. १७ क मधून भाजपा च्या उमेदवाराचा यांचा चुकीचा अर्ज वैध केला असून निवडणूक आयोगाकडे तक्रारीची दखल न घेतल्याने न्यायालयात दाद मागणार असल्याचे काँग्रेस चे भरत वाल्हेकर यांचा इशाराप्रभाग…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    झोपडपट्टीचा विकास हाच आमचा खरा संकल्प – आमदार सुनील कांबळे

    क्वाड्रंगुलर गोल्फ चषक पुना क्लब गोल्फ ने पटकावला

    प्रभाग १७ बाबत कायदेशीर न्याय मिळावा- भरत वाल्हेकर

    गोल्फ खेळाडूंनी दिला सामाजिक योगदानाचा आदर्श

    प्रभाग २६मध्ये रवी पाटोळे यांची प्रचारात आघाडी

    अविनाश बागवे व प्रभाग २२ च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची आज जाहीर सभा

    अविनाश बागवे व प्रभाग २२ च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची आज जाहीर सभा