विवेकानंद कॉलेज : विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना पंख देणारे समृद्ध व्यासपीठ – विंग कमांडर गजानन हरळीकर

कोल्हापूर :आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर मर्यादित न राहता आपल्या सुप्त क्षमतांना वाव देणे आणि त्यांचे करिअर संधींमध्ये रूपांतर करणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने विवेकानंद कॉलेज म्हणजे विद्यार्थ्यांना दिशा देणारे आणि त्यांच्या क्षमतांना वाव देणारे समृद्ध व्यासपीठ आहे, असे गौरवोद्गार भारतीय वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी विंग कमांडर गजानन हरळीकर यांनी काढले.

विवेकानंद कॉलेजच्या वतीने आयोजित “विद्यार्थी सक्षमीकरण आणि करिअर समुपदेशन” या कार्यक्रमात ते बोलत होते. कॉलेजमधील शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध संधी आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे येथे शिकणारे विद्यार्थी स्पर्धेच्या प्रवाहात सक्षमपणे टिकतात, असे ते म्हणाले. रोजगाराच्या विविध संधी, सरकारी नोकऱ्यांमधील प्रतिष्ठा आणि व्यावसायिक शिक्षणातील बदलत्या प्रवाहाचा मागोवा घेत विद्यार्थ्यांनी आपली ऊर्जा योग्य दिशेने वळवावी, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. सुदर्शन शिंदे (स्टाफ सेक्रेटरी, ज्युनिअर सायन्स विभाग) यांनी स्वागतपर भाषणातून विवेकानंद कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्तेचा, पारंपारिक शिक्षणातील अग्रक्रमाचा व विद्यार्थ्यांच्या समर्पणाचा गौरव केला. कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने (विश्रामभाग, सांगली) यांची विशेष उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. किशोर गुजर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एल. एस. नाकाडी यांनी प्रभावीपणे पार पाडले.

कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे,
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, प्रा. गीतांजली साळुंखे, प्रा. सौ. शिल्पा भोसले, प्रा. मुकुंद नवले, प्रा. हेमंत पाटील, मेजर सुनिता भोसले, IQAC प्रमुख डॉ. श्रुती जोशी, कर्नल मानस दीक्षित, कर्नल विक्रम नलावडे, तसेच कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

जागतिक दुग्ध परिषदेत ‘गोकुळ’चा आवाज आंतरराष्ट्रीय दूध परिषदेसाठी डॉ. चेतन नरके यांची निवड

कोतोली-पांडुरंग फिरींगे जागतिक दुग्ध व्यवसायाच्या भवितव्यावर मंथन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दूध प्रक्रिया परिषदेत ‘गोकुळ’ दूध संघाचा आवाज घुमणार आहे. ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांची या प्रतिष्ठित परिषदेसाठी निवड झाली असून,…

महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी दुबईत सुवर्णसंधी; ‘महाबीझ २०२६’ जागतिक परिषदेचे आयोजन

मुंबई/दुबई: महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांना जागतिक बाजारपेठेची दारे उघडून देण्यासाठी दुबईतील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यावसायिक नेटवर्किंग संस्था ‘जीएमबीएफ ग्लोबल’ (GMBF Global) सज्ज झाली आहे. येत्या ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

प्रभाग १७ बाबत कायदेशीर न्याय मिळावा- भरत वाल्हेकर

गोल्फ खेळाडूंनी दिला सामाजिक योगदानाचा आदर्श

प्रभाग २६मध्ये रवी पाटोळे यांची प्रचारात आघाडी

अविनाश बागवे व प्रभाग २२ च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची आज जाहीर सभा

अविनाश बागवे व प्रभाग २२ च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची आज जाहीर सभा

प्रभाग 26मधील काँग्रेसचे उमेदवार रवी पाटोळे यांच्या निवडून कचेरीच्या उद्घाटन

प्रभाग 26मधील काँग्रेसचे उमेदवार रवी पाटोळे यांच्या निवडून कचेरीच्या उद्घाटन

पुण्यात उदयापासून निर्मायान गोल्फ स्पर्धेचे आयोजन

पुण्यात उदयापासून निर्मायान गोल्फ स्पर्धेचे आयोजन