कोल्हापूर:आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनांचे प्रमोशन व व्यवसायाच्या जागतिकीकरणासाठी (ग्लोबलायझेशन) गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम च्या वतीने
‘महाबिझ परिषदेचे आयोजन दुबई येथे दर दोन वर्षांनी करण्यात येते. महाबिझ 2026 ‘रोड शो’ नुकताच राजश्री शाहू स्मारक भवन येथील मिनी हॉलमध्ये पार पडला.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे अध्यक्षस्थानी होते. तर कोल्हापूर ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात GMBF Global चे आयोजन सचिव . नितीन सासटकर यांच्या माहितीने झाली. GMBF Global चे सरचिटणीस (दुबई) विवेक कोल्हटकर (ज्यांनी बुर्ज खलिफा आणि दुबई मेट्रोच्या कामात सहभाग घेतला आहे) यांनी नवीन देशांमध्ये उद्योगाचा विस्तार करण्यासाठी महाबीज परिषदेची उपयुक्तता सविस्तरपणे स्पष्ट केली. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सरचिटणीस . सुहास फडणीस यांनी संस्थेशी जोडले असल्याचा दहा वर्षांचा अनुभव सांगितला. अध्यक्ष श्री. संजय शेटे यांनी कोल्हापूरच्या उत्पादनांना दुबईत बाजारपेठ मिळवून देण्याची ग्वाही दिली.
‘महाबिझ’ची आंतरराष्ट्रीय परिषद दोन दिवस ३१ जानेवारी २०२६ आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबईतील ‘अटलांटिस द पाम’ या हॉटेलमध्ये होणार आहे.
GMBF Global चे मीडिया प्रमुख दिलीप खेडेकर यांनी आभार प्रदर्शन केले आणि दुबई प्रवासासंबंधी अधिक माहितीसाठी श्री. बळीराम वराडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. जास्तीत जास्त उद्योजकांनी परिषदेसाठी नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
–