डॉ. सुजित मिणचेकर, राहुल आवाडे शिंदे सेनेच्या वाटेवर!

कोल्हापूर : विधानसभा निवडणुका जवळ येत असताना जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संभाव्य लढतींचे चित्र हळूहळू स्पष्ट होत असून कोण नेता कुठल्या पक्षातून उमेदवार असेल या साठी नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहूल आवाडे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

डॉ. मिणचेकर आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्यामध्ये पक्षप्रवेशाबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीसह महाविकास आघाडीला फुटीचे धक्के बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुक नजीक येत असल्याने पक्ष बदलण्याच्या हालचाली वेगाने सुरु आहेत.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीमधून भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहूल देसाई, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (शरद पवार गट) प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटाचे माजी आमदार के.पी. पाटील महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याच्या विचारात आहेत. ठाकरे गटाचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी महायुतीचे आमदार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठींबा दिला आहे. शिवाय, डॉ. सुजित मिणचेकर देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीचा आणखी एक नेता महायुतीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

राहूल आवाडे यांना मुख्यमंत्र्यांची खुली ऑफर

भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहूल आवाडे इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. पण, भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर देखील इच्छुक आहेत, त्यामुळे भाजपने आवाडे यांच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. लाडकी बहिण योजना सन्मान सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना आवाडे यांनी विमानतळावर त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राहूल आवाडे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली आहे, त्यामुळे भाजपकडून निर्णय होत नसल्यामुळे आवाडे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Related Posts

विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय एड्स दिन; सायकल रॅली, पथनाट्य व शपथेद्वारे प्रभावी जनजागृती

कोल्हापूर : प्रतिनिधी मानवी जीवन अधिक समृद्ध, सुरक्षित व रोगमुक्त करण्यासाठी एड्सविषयी जागरूकता अत्यावश्यक आहे. 21 व्या शतकाच्या उत्तरार्धात मानवजातीसमोर भीषण आव्हान ठरलेला एचआयव्ही–एड्स हा संसर्गजन्य आजार आजही विकसनशील देशांमध्ये घातक…

विवेकानंद कॉलेज : विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना पंख देणारे समृद्ध व्यासपीठ – विंग कमांडर गजानन हरळीकर

कोल्हापूर :आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर मर्यादित न राहता आपल्या सुप्त क्षमतांना वाव देणे आणि त्यांचे करिअर संधींमध्ये रूपांतर करणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने विवेकानंद कॉलेज म्हणजे विद्यार्थ्यांना दिशा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय एड्स दिन; सायकल रॅली, पथनाट्य व शपथेद्वारे प्रभावी जनजागृती

विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय एड्स दिन; सायकल रॅली, पथनाट्य व शपथेद्वारे प्रभावी जनजागृती

विवेकानंद कॉलेज : विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना पंख देणारे समृद्ध व्यासपीठ – विंग कमांडर गजानन हरळीकर

विवेकानंद कॉलेज : विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना पंख देणारे समृद्ध व्यासपीठ – विंग कमांडर गजानन हरळीकर

ब्रेकिंग! क्रिप्टो फसवणूक प्रकरणी न्यायालयातील बेलीफला अटक: २.८६ कोटींची फसवणूक

ब्रेकिंग! क्रिप्टो फसवणूक प्रकरणी न्यायालयातील बेलीफला अटक: २.८६ कोटींची फसवणूक

वकृत्व स्पर्धेत उषाराजेची स्वरा वातकर प्रथम

वकृत्व स्पर्धेत उषाराजेची स्वरा वातकर प्रथम

तेनकासीमधील शांत क्रांती :श्रीधर वेबुंची प्रेरणादायी गोष्ट

तेनकासीमधील शांत क्रांती :श्रीधर वेबुंची प्रेरणादायी गोष्ट

दारुड्या माणसाने वाघाला पाजली दारु, व्हायरल व्हिडिओमागील सत्य काय!

दारुड्या माणसाने वाघाला पाजली दारु, व्हायरल व्हिडिओमागील सत्य काय!