पन्हाळा -प्रतिनिधी
विद्या मंदिर उंड्री व खोतवाडी येथील शाळांमध्ये भारत सरकारच्या साप्ताहिक लोह व फॉलिक ॲसिड पूरक आहार कार्यक्रम (WIFS) अंतर्गत विद्यार्थ्यांना लोह व फॉलिक ॲसिड गोळ्यांचे सेवन शिक्षकांच्या देखरेखीखाली करण्यात आले.
किशोरवयीन मुला–मुलींमध्ये ॲनिमिया (अशक्तपणा) कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमांतर्गत आठवड्यातून एकदा १०० मि.ग्रॅ. लोह व ५०० मि.ग्रॅ. फॉलिक ॲसिडची गोळी दिली जाते. लोह व फॉलिक ॲसिडमुळे लाल रक्तपेशींची निर्मिती वाढून ऊर्जा मिळते, ॲनिमियाचा प्रतिबंध होतो तसेच आरोग्य सुधारते. यासोबतच डी-वॉर्मिंग गोळ्यांचेही वितरण करण्यात येते.
या उपक्रमास संदिप पांडुरंग पाटील (आरोग्य सेवक), संगीता सागर कोकितकर (आरोग्य सेविका) यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय शंकर गुरव, शिक्षकवर्ग सुशांत शहाजी कुंभार, संजय उत्तम पाटील, प्रभाकर गोविंद कांबळे, अरविंद धोंडीराम सावंत तसेच अभिजित पांडुरंग जाधव उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असून शाळा प्रशासनाने कार्यक्रमाची नियमित अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी दुबईत सुवर्णसंधी; ‘महाबीझ २०२६’ जागतिक परिषदेचे आयोजन
मुंबई/दुबई: महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांना जागतिक बाजारपेठेची दारे उघडून देण्यासाठी दुबईतील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यावसायिक नेटवर्किंग संस्था ‘जीएमबीएफ ग्लोबल’ (GMBF Global) सज्ज झाली आहे. येत्या ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी…