
पुणे दि —- प्रभाग क्रमांक २६ समता भूमी -घोरपडे पेठ मधील अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी पाटोळे यांच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन काँग्रेस पक्षाचे नेते मोहनदादा जोशी व माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते पार पडले .यावेळी मातंग समाजाचे मार्गदर्शक अंकल सोनवणे उपस्थित होते .
यावेळी मतदारसंघातील उमेदवार अँड.भावना बोराटे,संजीवनी बालगुडे ,सईद सय्यद उपस्थित होते .यांनी आपल्या प्रचाराची आजची सुरवात समता भूमी पासून करण्यात आली .ठिकठिकाणी छोटे व्यावसायिक ,महिला व युवक मोठ्या प्रमाणात स्वागत करताना दिसून येत होते .रिक्षावाले व पथारी व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे रवी पाटोळे यांनी यावेळी सांगितले .
तसेच या वसाहतीतील नागरिकांचे विविध प्रश्न अतिशय काळजीपूर्वक सोडवण्याचे रबी पाटोळे यांनी आश्वासन दिले .
समता भूमी या प्रभागातील नागरिक आणि महिला व कार्यकर्ते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने दिसून येत होते .काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित नागरिकांनी केला .







