सर्वधर्म समभाव जपत शहादल बाबा दर्ग्यात इफ्तार पार्टी: वारकरी संप्रदायाचा उत्स्फूर्त सहभाग

सर्वधर्म समभावाचा संदेश देत येरवडा येथे इफ्तार पार्टी; वारकरी संप्रदायाचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे, दि. — पवित्र रमजान महिन्यानिमित्त येरवडा येथील शहादल बाबा दर्गा येथे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत सर्वधर्म समभावाचा सुंदर संदेश देत वारकरी संप्रदायाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध धर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला राजाभाऊ रंधवे, इक्रम खान, सुनील मलके, निलेश आल्हाट, सुरेंद्र पठारे, डॅनियल लांडगे, मेहबूब शेख, हनीफ शेख आणि अविनाश साळवे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच वारकरी संप्रदायातील भाविक, सामाजिक कार्यकर्ते तसेच पुणे शहर पोलीस प्रशासनातील अधिकारी व पदाधिकारीही उपस्थित होते.

यावेळी इक्रम खान यांनी मार्गदर्शन करत समाजात बंधुभाव, एकता आणि सर्वधर्म समभाव जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या इफ्तार कार्यक्रमाला पुणे शहरातील विविध जाती-धर्मातील नागरिक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम समाजासह इतर धर्मीय नागरिकांनीही मोठ्या उत्साहात सहभागी होत सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला.

या इफ्तार पार्टीचे आयोजन शहादल बाबा दर्गा समिती, इक्रम खान तसेच विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

  • Related Posts

    आंबेडकर जयंतीनिमित्त येरवडा येथे स्नेहभोजन

    *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येरवडा येथे स्नेहभोजनाचे आयोजन*— आंबेडकरांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज — इक्रमभाई खान पुणे, दि. — भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणे आज गरजेचे…

    वंचित,दलित आदिवासी घटकांसाठी मदतीचा उपक्रम: क्षितिज फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

    पुणे दि. — क्षितिज व्हिजन फाउंडेशन हे चॅरिटेबल ट्रस्ट असून वंचित घटकांचे हक्क संरक्षण, सामाजिक आधार आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. समाजातील दुर्बल घटकांना कायदेशीर अडचणींमध्ये योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यांना…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आंबेडकर जयंतीनिमित्त येरवडा येथे स्नेहभोजन

    वंचित,दलित आदिवासी घटकांसाठी मदतीचा उपक्रम: क्षितिज फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

    सर्वधर्म समभाव जपत शहादल बाबा दर्ग्यात इफ्तार पार्टी: वारकरी संप्रदायाचा उत्स्फूर्त सहभाग

    सर्वधर्म समभावाचा संदेश देत येरवड्यातील शहादल बाबा दर्ग्यात इफ्तार पार्टी

    कोंढव्यातील इफ्तार पार्टीला मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

    पुण्यात रविवारी मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवकांचा सत्कार समारंभ