PM kisan yojana
वसंत पाटील/बांबवडे
PM Kisan Yojana पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य व्हाव या हेतु ते किसान सन्मान निधी चालु केला यातुन प्रत्येक शेतकरी बांधवाना प्रती वर्ष ६ हजार रुपये थेट बँक खात्यांत जमा होऊ लागले होते. पण के वाय सी चे नुतनीकरण केल्या नंतर या प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्या असुन लाभार्था चे पत्ता , नाव किंवा जमीनच नसल्यांने दाखवल जात आहे. पण यांत दुरुस्ती साठी शेतकऱ्यांनी २ वर्ष सेवा केंद्र तलाठी ,कृषी विभाग , तहसीलदार आदी कडे पाठपुरावा करून देखील अद्यापही दुरुस्ती होत नसल्याने या योजनेच्या लाभा पासुन शेतकरी वंचित रहात आहेत त्यांतच राज्य सरकारने ही चालु केलेल्या किसान सन्मान निधी चा लाभा पासुन ही वंचित रहाव लागत आहेत.
यांतच वारंवार या विभागांचे काम करणारी यंत्रणा बदलत असल्यांने नेमकी दुरूस्ती करणार कोण व ते करण्यांसाठी ईतकी दिरंगाई का केली जात आहे असा प्रश्न शेतकरी वर्गातुन उपस्थित केला जात आहे. हेलपाटे मारून दोन वर्षात मनस्ताप सहन करावा लागत असुन हजारो रूपये खर्च करावे लागत असल्पाने शेतकरी वर्गात नाराजी व्यक केली जात आहे.
“शेतकरी वर्गांच्या सन्मानासाठी व आर्थिक सहाय्य म्हणून चालु केलेल्या योजनांच्या लाभा साठी शेतकरी वर्गाला वर्षभर हेलपाटे मारावे लागत आहेत प्रशासनांला वारंवार याबाबत कळवून देखील त्रुटीचे निराकरण होत नसुन लाभार्थी लाभा पासुन वंचित रहात आहेत”.
आनंदा पाटील सरपंच, साळशी ता शाहुवाडी
“सुरवातीला हप्ते जमा झाले गेली वर्षभर हप्ते येत नसुन अनेकदा दुरुस्ती साठी हेलपाटे मारले पण अद्यापही दुरुस्ती झाली नसुन लाभ मिळत नाही.”
बाजीराव पाटील शेतकरी साळशी
भारतीय पुरातत्व खात्याकडून ऐतिहसिक वास्तूला झळाळीगडकोटांची छायाचित्रे व माहिती पर्यटकांना एकाचा छताखाली संधी रामचंद्र काशीद-पन्हाळा:…
मुंबई: भारतीय उद्योगजगताला आज मोठा धक्का बसला आहे, देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन…
Sagar Bagade यांचे काम प्रेरणादायी: नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक Kolhapur: Sagar Bagade सागर बगाडे…
कोल्हापूर : महाराष्ट्र सरकारने शासकीय विद्यापीठांना लहान विद्यापीठांमध्ये विभाजित करण्याच्या धोरणांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगरला राज्यातील…
कोल्हापूर : विधानसभा निवडणुका जवळ येत असताना जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संभाव्य लढतींचे…
पिशवी : शाहुवाडी तालुक्यांत मुसळधार पावसाने ऐकीकडे सोयाबीन,भुईमुग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तर जोमांत…
View Comments
Mark losses, experience etc