# आपली बातमी ## Posts - [अविनाश बागवे व प्रभाग २२ च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची आज जाहीर सभा](https://aaplibatmi.news/satej-patil-to-campaign-for-avinash-bagwe/): पुणे दि. … अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार अविनाश बागवे ,इंदिरा अविनाश बागवे ,रफिक शेख व दिलशाद शेख यांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार सतेज पाटील याची पुण्यातील हरकानगर काशेवाडी येथे जाहीर सभाचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे असतील .ही सभा सांयकाळी आठ वाजता सुरू होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे . - [प्रभाग 22 मधील काँग्रेसचे उमेदवार रवी पाटोळे यांच्या निवडून कचेरीच्या उद्घाटन](https://aaplibatmi.news/ward-22-candidate-ravi-patole-office-opening/): पुणे दि —- प्रभाग क्रमांक २६ समता भूमी -घोरपडे पेठ मधील अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी पाटोळे यांच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन काँग्रेस पक्षाचे नेते मोहनदादा जोशी व माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते पार पडले .यावेळी मातंग समाजाचे मार्गदर्शक अंकल सोनवणे उपस्थित होते . यावेळी मतदारसंघातील उमेदवार अँड.भावना बोराटे,संजीवनी बालगुडे ,सईद सय्यद उपस्थित होते .यांनी आपल्या प्रचाराची आजची सुरवात समता भूमी पासून करण्यात आली .ठिकठिकाणी छोटे व्यावसायिक ,महिला व युवक मोठ्या प्रमाणात स्वागत करताना दिसून येत होते .रिक्षावाले व पथारी व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे रवी पाटोळे यांनी यावेळी सांगितले .तसेच या वसाहतीतील नागरिकांचे विविध प्रश्न… - [पुण्यात उदयापासून निर्मायान गोल्फ स्पर्धेचे आयोजन](https://aaplibatmi.news/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be/): पुणे, दि. —— भारत निर्मायन प्रो-अ‍ॅम चॅरिटी गोल्फ स्पर्धेची सहावी राष्ट्रीय गोल्फ स्पर्धा 9 व 10 जानेवारी 2026 रोजी पुण्यातील प्रतिष्ठित पूना क्लब गोल्फ कोर्स येथे आयोजित केली जाणार आहे.या स्पर्धेतून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार असल्याची माहिती आयोजक राजीव दातार यांनी दिली आहे . २०२६ च्या आवृत्तीत अनिर्बान लाहिरी, शिव कपूर, शुभंकर शर्मा, एस.एस.पी. चौरसिया आणि पुण्यातील ऑलिंपियन उदयन माने यांच्यासह भारतातील काही प्रसिद्ध गोल्फपटू सहभागी होतील. हे व्यावसायिक हौशी गोल्फपटूंसोबत एकत्र येऊन स्पर्धेतील क्रीडाभावना आणि दानशूरपणाची भावना मूर्त रूप देतील. निर्मयने कात्यायनी बालसुब्रमण्यम आणि रिपल मिरचंदानी यांनी स्थापन केलेल्या आणि शिक्षणाची उपलब्धता सक्षम करण्यासाठी समर्पित असलेल्या मुदिता… - [साप्ताहिक लोह व फॉलिक ॲसिड पूरक आहार कार्यक्रम उंड्री व खोतवाडी शाळांत राबविण्यात आला](https://aaplibatmi.news/iron-folic-acid-suppliments-in-rural-schools/): पन्हाळा -प्रतिनिधीविद्या मंदिर उंड्री व खोतवाडी येथील शाळांमध्ये भारत सरकारच्या साप्ताहिक लोह व फॉलिक ॲसिड पूरक आहार कार्यक्रम (WIFS) अंतर्गत विद्यार्थ्यांना लोह व फॉलिक ॲसिड गोळ्यांचे सेवन शिक्षकांच्या देखरेखीखाली करण्यात आले.किशोरवयीन मुला–मुलींमध्ये ॲनिमिया (अशक्तपणा) कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमांतर्गत आठवड्यातून एकदा १०० मि.ग्रॅ. लोह व ५०० मि.ग्रॅ. फॉलिक ॲसिडची गोळी दिली जाते. लोह व फॉलिक ॲसिडमुळे लाल रक्तपेशींची निर्मिती वाढून ऊर्जा मिळते, ॲनिमियाचा प्रतिबंध होतो तसेच आरोग्य सुधारते. यासोबतच डी-वॉर्मिंग गोळ्यांचेही वितरण करण्यात येते.या उपक्रमास संदिप पांडुरंग पाटील (आरोग्य सेवक), संगीता सागर कोकितकर (आरोग्य सेविका) यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय शंकर गुरव, शिक्षकवर्ग सुशांत शहाजी… - [जागतिक दुग्ध परिषदेत ‘गोकुळ’चा आवाज आंतरराष्ट्रीय दूध परिषदेसाठी डॉ. चेतन नरके यांची निवड](https://aaplibatmi.news/chetan-narke-elected-on-world-milk-council/): कोतोली-पांडुरंग फिरींगे जागतिक दुग्ध व्यवसायाच्या भवितव्यावर मंथन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दूध प्रक्रिया परिषदेत ‘गोकुळ’ दूध संघाचा आवाज घुमणार आहे. ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांची या प्रतिष्ठित परिषदेसाठी निवड झाली असून, ते नवी दिल्ली येथे होणाऱ्या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.जागतिक दुग्ध व्यवसायातील बदलती गती, सहकारी व खासगी संस्थांची भूमिका, तसेच २०४७ पर्यंत दूध व्यवसायात होणारे दूरगामी बदल या महत्त्वाच्या विषयांवर डॉ. नरके आपले विचार मांडणार आहेत. ‘गोकुळ’चे प्रतिनिधी म्हणून त्यांचा सहभाग हा संघासाठी गौरवाचा क्षण मानला जात आहे.प्रोमोशन कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित या परिषदेत देशातील दुग्ध व्यवसायाच्या वाटचालीवर देशपातळीवरील तज्ज्ञ सखोल चर्चा करणार आहेत. परिषदेला तामिळनाडूचे दुग्धमंत्री थिरु माणो… - [महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी दुबईत सुवर्णसंधी; 'महाबीझ २०२६' जागतिक परिषदेचे आयोजन](https://aaplibatmi.news/opportunity-to-maharashtra-enterprenuer-in-dubai/): मुंबई/दुबई: महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांना जागतिक बाजारपेठेची दारे उघडून देण्यासाठी दुबईतील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यावसायिक नेटवर्किंग संस्था ‘जीएमबीएफ ग्लोबल’ (GMBF Global) सज्ज झाली आहे. येत्या ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबईत ‘महाबीझ २०२६’ (MahaBiz 2026) या भव्य आंतरराष्ट्रीय उद्योजक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभागी होऊन आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा, असे आवाहन संस्थेचे मीडिया सचिव दिलीप खेडेकर यांनी केले आहे. २५ वर्षांचा समृद्ध वारसा आणि नि:स्वार्थ मार्गदर्शनजीएमबीएफ ग्लोबल ही संस्था गेल्या दोन दशकांपासून दुबईत कार्यरत आहे. विशेष म्हणजे, या संस्थेच्या कोअर कमिटीतील १४ सदस्य स्वतः यशस्वी उद्योजक असून, महाराष्ट्रातील नवोदित आणि अनुभवी उद्योजकांना मार्गदर्शन… - [प्रभाग २६ मधील काँग्रेस च्या उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद](https://aaplibatmi.news/ward-26-congress-candidate-getting-overwhelming-response/): -पुणे : प्रभाग क्रमांक २६ समता भूमी -घोरपडे पेठ मधील अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी पाटोळे,अँड.भावना बोराटे,संजीवनी बालगुडे ,सईद सय्यद यांनी आपल्या प्रचाराची आजची सुरवात समता भूमी पासून करण्यात आली .ठिकठिकाणी छोटे व्यावसायिक ,महिला व युवक मोठ्या प्रमाणात स्वागत करताना दिसून येत होते . रिक्षावाले व पथारी व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे रवी पाटोळे यांनी यावेळी सांगितले .तसेच या वसाहतीतील नागरिकांचे विविध प्रश्न अतिशय काळजीपूर्वक सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले .समता भूमी या प्रभागातील नागरिक आणि महिलांनी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांचे अतिशय उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले .ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाच्या घोषणा देताना कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसून येत… - [कै. संभाजी भाऊ पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत उंड्री स्पोर्ट्स विजेते](https://aaplibatmi.news/%e0%a4%95%e0%a5%88-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%8a-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4/): पन्हाळा प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगेकै. पांडुरंग भाऊ पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, दिगवडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कै. संभाजी भाऊ पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात उंड्री स्पोर्ट्स, उंड्री संघाने शानदार खेळ करत विजेतेपद (₹५१,००० रोख व चषक) पटकावले.कोतोली येथील एस. डी. स्पोर्ट्स संघाने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद (₹३१,००० रोख व चषक) मिळवले. तसेच रामलिंग स्पोर्ट्स, म्हाळुंगे व जानता राजा स्पोर्ट्स, तिसंगी या संघांना उत्तेजनार्थ चषक व रोख रक्कम प्रदान करण्यात आली.वैयक्तिक कामगिरीत साहिल मोमीन याने सातत्यपूर्ण व दमदार खेळ करत मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार पटकावला.अक्षय पाटील यास बेस्ट बॅट्समन तर शुभम… - [कोतोलीवर शोककळा… ऐन उमेदीत विनायक तुरंबेकर यांचे अकाली निधन](https://aaplibatmi.news/vinayak-turambekar-no-more-kotoli-is-shocked/): कोतोली | प्रतिनिधीकोतोली येथील विनायक नामदेव तुरंबेकर यांचे आज पहाटे अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ऐन उमेदीच्या काळात काळाने घाव घातल्याने संपूर्ण कोतोली परिसरावर शोककळा पसरली आहे. ही घटना केवळ एक व्यक्ती गेल्याची नसून, एका हसतमुख, मनमिळाऊ आणि सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या अकाली अस्ताची आहे.विनायक हे एका संस्थेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. कामातील प्रामाणिकपणा, माणसांशी जोडलेपण आणि मदतीस तत्पर स्वभाव यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. कोणत्याही कार्यक्रमात, सुख-दुःखात ते आवर्जून उपस्थित असत. कालच ते एका शुभ कार्यात सहभागी झाले होते आणि काही तासांतच अशी दुःखद बातमी येईल, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही.अलीकडच्या काळात तरुण वयातही हृदयविकाराचे झटके येत असल्याच्या… - [शाळेच्या उपक्रमांनी प्रेरित होऊन लंडनस्थित युवकाकडून विद्यामंदिर कांटे शाळेस आर्थिक मदत](https://aaplibatmi.news/nri-student-help-village-school-in-shahuwadi-taluka/): शाहुवाडी -प्रतिनिधी पांडुरंग फिरींगेशाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या विद्यामंदिर कांटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नाविन्यपूर्ण शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी लंडनमध्ये कार्यरत असलेल्या युवकाला प्रेरित करून सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण घडवले आहे. शाळेच्या यूट्यूब चॅनलवरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, विविध उपक्रमांतील सक्रिय सहभाग आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास पाहून लंडनस्थित युवक किरण मधुकर सावर्डेकर (रा. म्हाळुंगे तर्फे बोरगाव) विशेषतः प्रभावित झाले. “जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिकल्या पाहिजेत” या सामाजिक जाणिवेतून तसेच आपले वर्गशिक्षक व गुरू आदरणीय पी. डी. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विद्यामंदिर कांटे शाळेच्या कमानीसाठी १०,००० रुपये आर्थिक मदत दिली. या प्रसंगी किरण सावर्डेकर यांनी लंडन येथून व्हिडिओ कॉलद्वारे शाळेतील… - [उद्योजक व नव-उद्योजकांसाठी दुबई येथे 'महाबीज' परिषदेचे आयोजन; कोल्हापुरात 'रोड शो'!](https://aaplibatmi.news/mahabiz2026-road-show-in-kolhapur/): कोल्हापूर:आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनांचे प्रमोशन व व्यवसायाच्या जागतिकीकरणासाठी (ग्लोबलायझेशन) गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम च्या वतीने ‘महाबिझ परिषदेचे आयोजन दुबई येथे दर दोन वर्षांनी करण्यात येते. महाबिझ 2026 ‘रोड शो’ नुकताच राजश्री शाहू स्मारक भवन येथील मिनी हॉलमध्ये पार पडला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे अध्यक्षस्थानी होते. तर कोल्हापूर ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात GMBF Global चे आयोजन सचिव . नितीन सासटकर यांच्या माहितीने झाली. GMBF Global चे सरचिटणीस (दुबई) विवेक कोल्हटकर (ज्यांनी बुर्ज खलिफा आणि दुबई मेट्रोच्या कामात सहभाग घेतला आहे) यांनी नवीन देशांमध्ये उद्योगाचा विस्तार करण्यासाठी महाबीज परिषदेची उपयुक्तता सविस्तरपणे स्पष्ट… - [शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी विवेकानंद कॉलेजच्या अनुष्का पाटीलची महाराष्ट्र संघात निवड](https://aaplibatmi.news/maharashtra-team-selects-vivekanand-colleges-anushka-patil-for-school-national-kurash-competition/): कोल्हापूर प्रतिनिधी इंदापूर, पुणे येथे 27 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय 17 वर्षाखालील मुलींच्या शालेय कुराश स्पर्धेत विवेकानंद कॉलेजची अनुष्का अजित पाटील (इयत्ता ११वी, विज्ञान) हिने अतिशय दमदार कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली. तिच्या या उज्ज्वल कामगिरीच्या जोरावर तिची उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली असून कोल्हापूरचा अभिमान आणखी उंचावला आहे. अनुष्काच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या यशामागे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे व सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे महत्त्वपूर्ण प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस.पी. थोरात, ज्युनिअर… - [विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय एड्स दिन; सायकल रॅली, पथनाट्य व शपथेद्वारे प्रभावी जनजागृती](https://aaplibatmi.news/international-aids-day-at-vivekananda-college-effective-public-awareness-through-cycle-rally-street-play-and-oath/): कोल्हापूर : प्रतिनिधी मानवी जीवन अधिक समृद्ध, सुरक्षित व रोगमुक्त करण्यासाठी एड्सविषयी जागरूकता अत्यावश्यक आहे. 21 व्या शतकाच्या उत्तरार्धात मानवजातीसमोर भीषण आव्हान ठरलेला एचआयव्ही–एड्स हा संसर्गजन्य आजार आजही विकसनशील देशांमध्ये घातक रूप दाखवत आहे. या रोगाचा प्रसार कसा होतो, त्याची प्रतिबंधक साधने कोणती, तसेच संक्रमित व्यक्तींविषयी समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी वैज्ञानिक माहितीचा प्रसार मोठ्या प्रमाणात व्हायला हवा, असे प्रतिपादन सी.पी.आर. रुग्णालयाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी सौ. दीपा शिपूरकर व समुपदेशिका सौ. सुरेखा जाधव (पंचगंगा हॉस्पिटल) यांनी केले. विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय एड्स दिनानिमित्त रेड रिबन क्लब, आयक्युएसी विभाग, एनसीसी आणि एनएसएस यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे प्रभावी आयोजन करण्यात आले. एनसीसी मुलींची सायकल… - [विवेकानंद कॉलेज : विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना पंख देणारे समृद्ध व्यासपीठ – विंग कमांडर गजानन हरळीकर](https://aaplibatmi.news/vivekanand-college-a-rich-platform-that-gives-wings-to-students-latent-potential/): कोल्हापूर :आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर मर्यादित न राहता आपल्या सुप्त क्षमतांना वाव देणे आणि त्यांचे करिअर संधींमध्ये रूपांतर करणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने विवेकानंद कॉलेज म्हणजे विद्यार्थ्यांना दिशा देणारे आणि त्यांच्या क्षमतांना वाव देणारे समृद्ध व्यासपीठ आहे, असे गौरवोद्गार भारतीय वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी विंग कमांडर गजानन हरळीकर यांनी काढले. विवेकानंद कॉलेजच्या वतीने आयोजित “विद्यार्थी सक्षमीकरण आणि करिअर समुपदेशन” या कार्यक्रमात ते बोलत होते. कॉलेजमधील शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध संधी आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे येथे शिकणारे विद्यार्थी स्पर्धेच्या प्रवाहात सक्षमपणे टिकतात, असे ते म्हणाले. रोजगाराच्या विविध संधी, सरकारी नोकऱ्यांमधील प्रतिष्ठा आणि व्यावसायिक शिक्षणातील बदलत्या प्रवाहाचा मागोवा घेत विद्यार्थ्यांनी… - [ब्रेकिंग! क्रिप्टो फसवणूक प्रकरणी न्यायालयातील बेलीफला अटक: २.८६ कोटींची फसवणूक](https://aaplibatmi.news/court-belief-arrested-for-crypto-currency-scam/): Court belief kolhapur, crypto currency scam - [वकृत्व स्पर्धेत उषाराजेची स्वरा वातकर प्रथम](https://aaplibatmi.news/swara-watkar-succes-in-elocuatuon-competation/): कोल्हापूर : पांडुरंग फिरींगे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय डॉ. ग. वा. तगारे वक्तृत्व स्पर्धा २०२५ मध्ये उषाराजे हायस्कूल, कोल्हापूरची कु. स्वरा सागर वातकर हिने चमकदार कामगिरी करत मोठा गट (८वी ते १०वी) मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. उत्कृष्ट सादरीकरण, अचूक विषयआकलन आणि प्रभावी मांडणी याच्या जोरावर स्वराने स्पर्धेत उपस्थित परीक्षक व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. जिल्हाभरातील नामांकित शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्वराने प्राविण्य सिद्ध करून उषाराजे हायस्कूलचे नाव उज्ज्वल केले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व स्पर्धेचे आयोजक रोटरी–रोटरॅक्ट क्लब पदाधिकाऱ्यांनी तिचे… - [तेनकासीमधील शांत क्रांती :श्रीधर वेबुंची प्रेरणादायी गोष्ट](https://aaplibatmi.news/sridhar-vembu-zoho-success-story-bootstrapped-rural-innovation-tenkasi/): भारत आज जगाच्या नकाशावर तंत्रज्ञान (Technology) आणि नवोन्मेषाचे (Innovation) पुढचे केंद्र म्हणून उभा राहत असताना, या यशकथेचा पाया रचणारे काही शांत योद्धे आहेत. ज्यांच्या नावाचा गजर होत नाही, पण ज्यांचे काम पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील. याच मालिकेतील एक जागतिक स्तरावरचे, पण आपल्या मातीशी घट्ट जोडलेले नेतृत्व म्हणजे श्रीधर वेम्बु! गेल्या काही वर्षांत, ‘स्वदेशी’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांची चर्चा अचानक वाढली, पण या गदारोळात, एक माणूस शांतपणे, कोणत्याही बाह्य भांडवलाच्या मदतीशिवाय (Bootstrapped), अथक प्रयत्न करून जागतिक दर्जाची सॉफ्टवेअर क्रांती घडवत होता. सिलिकॉन व्हॅलीचे उच्च शिक्षण जागतिक बिग टेक कपन्यांमध्ये आकर्षक संधी, पंचतारांकित राहणीमान याना, नकार दिला आणि तामिळनाडूच्या तेनकासी नावाच्या… - [दारुड्या माणसाने वाघाला पाजली दारु, व्हायरल व्हिडिओमागील सत्य काय!](https://aaplibatmi.news/drunk-man-pets-tiger-offers-it-liquor-in-pench-heres-the-truth-behind-viral-video-hi/): आपली बातमी :सोशल मीडियावर ‘एआय’ (AI) जनरेटेड व्हिडिओंच्या माध्यमातून खोट्या बातम्या वेगाने पसरत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात एक दारुड्या व्यक्ती पेंच व्याघ्र प्रकल्पात (Pench Tiger Reserve) वाघाला पाळीव प्राण्याप्रमाणे थोपटतो आणि त्याला दारू पाजण्याचा प्रयत्न करतो, असा दावा करण्यात आला आहे. Newschecker फॅक्ट चेक दावा: एका व्हायरल व्हीडिओ मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या आत एक नशेत असलेला माणूस वाघाला थोपटत आहे आणि त्याला दारू देऊ करत आहे. व्हीडीओ विश्लेषण आणि निष्कर्ष निष्कर्ष: Newschecker फॅक्टचेकर साईट च्या पडताळणीनुसार, दारुड्या माणसाने वाघाला दारू पाजल्याचा व्हायरल व्हिडिओ खोटा असून तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून तयार करण्यात आला आहे.4 हा… - [ट्रॅव्हल एजंट्सच्या समस्यांवर राष्ट्रीय स्तरावर तोडगा काढणार!](https://aaplibatmi.news/taak-travel-agents-association-of-india-meeting-kolhapur/): कोल्हापूर: ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया (TAAI) साउथ व मध्य महाराष्ट्र या संघटनेची त्रैमासिक सर्वसाधारण सभा नुकतीच कोल्हापुरातील हॉटेल ज्ञीप येथे उत्साहात पार पडली. एअरलाईन्स, हॉटेल इंडस्ट्री, व्हिसा, जीएसटी आणि टीसीएससारख्या ट्रॅव्हल एजंट्सना भेडसावणाऱ्या समस्यांवर राष्ट्रीय स्तरावर तोडगा काढण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. अध्यक्ष मेहबूब शेख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, TAAI ही संस्था ट्रॅव्हल एजंट्सच्या अडचणी थेट भारत सरकार आणि पर्यटन मंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी काम करते. सेक्रेटरी याजडी मार्कर यांनी उपस्थित एजंट्सना जीएसटी (GST) आणि टीसीएस (TCS) बद्दल महत्त्वाची माहिती दिली. “बिना जीएसटी/टीसीएस असलेला व्यवसाय भविष्यात गुन्हा ठरू शकतो, त्यामुळे सर्वांनी जीएसटीसह व्यवहार करावेत,” असे आवाहन… - [पन्हाळगडावरील धर्म कोठी वास्तूत साकारले ऐतिहासिक मुझियम (संग्रालय)](https://aaplibatmi.news/historical-museum-at-panhala-fort/): भारतीय पुरातत्व खात्याकडून ऐतिहसिक वास्तूला झळाळीगडकोटांची छायाचित्रे व माहिती पर्यटकांना एकाचा छताखाली संधी रामचंद्र काशीद-पन्हाळा: पन्हाळगडावरील धर्म कोठी वास्तूत ऐतिहासिक मुझियम (संग्रालय)साकारले असून भारतीय पुरातत्व खात्याकडून ऐतिहासिक वास्तूला झळाळी दिली आहे.हौशी पर्यटकांना एकाचा छताखाली गडकोटांची छायाचित्रे व माहिती संधी प्राप्त शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पन्हाळगड पर्यटन वैभवात भर पडल्याने इतिहास प्रेमींसह गडवासियांच्यात समधान पसरले आहे. केंद्र शासनाने भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश या सदराखाली जागतीक वारसा यादीत सामावेशासाठी ‘युनेस्को’ कडे प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावात महाराष्ट्रातील आकरा किल्यांना नामांकित केले आहे. व नामांकित केलेल्या किल्यांमध्ये पन्हाळगडाचा समावेश केला. त्यामुळे पन्हाळगडावर भारतीय पुरातत्व विभागाने ऐतिहासिक इमारतींची डागडुजीची कामे चालू केली.व गडावरील इतिहासाची साक्ष देणाऱ्या… - [प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन](https://aaplibatmi.news/ratan-tata-passess-away/): मुंबई: भारतीय उद्योगजगताला आज मोठा धक्का बसला आहे, देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपले दूरदर्शी नेतृत्व आणि समाज सेवा यामुळे रतन टाटा यांनी देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रात मोठा ठसा उमटवला होता. रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला होता. टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यांनी कंपनीला जागतिक स्तरावर पोहोचवले. त्यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने अनेक नवीन प्रकल्प आणि कंपन्या स्थापन केल्या, ज्यामध्ये टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. रतन टाटा यांचे समाजसेवेतील योगदान देखील वाखाणण्याजोगे आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी… - [Sagar Bagade म्हणाले ' मी ही कधी अनाथालयात राहिलो, म्हणूनच घेतले अनाथांना दत्तक](https://aaplibatmi.news/sagar-bagade-says-being-a-orphan-myself-working-for-orphans/): Sagar Bagade यांचे काम प्रेरणादायी: नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक Kolhapur: Sagar Bagade सागर बगाडे यांचे काम प्रेरणादायी आहे, असे, पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून देशातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी गप्पा मारल्या. त्यात कोल्हापूरचे एक शिक्षक, सागर बगाडे, यांनी त्याच्या कामामुळे पंतप्रधानांसह सर्वच लोकांचे लक्ष वेधून घेतले Sagar Bagade आणि प्रधानमंत्री मोदी यांच्या चर्चेत सागर बगाडेच्या आयुष्याची कथा समोर आली. स्वतः एक अनाथ असूनही पुढे जाऊन किमान ११ अनाथ मुलांचा शिक्षणाचा खर्च ते करतात. यामागील कारण जेंव्हा बगाडेंनी सांगितले तेंव्हा सभागृहातील सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. “मी महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये एक कला शिक्षक आहे,” सागर… - [आता 'वारणा विद्यापीठ'; महाराष्ट्राच्या पहिल्या क्लस्टर विद्यापीठाला राज्य सरकारची मान्यता](https://aaplibatmi.news/maharashtras-first-cluster-university-sanctioned-in-warnanagar/): कोल्हापूर : महाराष्ट्र सरकारने शासकीय विद्यापीठांना लहान विद्यापीठांमध्ये विभाजित करण्याच्या धोरणांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगरला राज्यातील पहिले क्लस्टर विद्यापीठ सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ चालवत असलेल्या तीन महाविद्यालयांचा समावेश असलेले वारणा विद्यापीठ, वारणानगरच्या वारणा सहकारी संघ समूहाचा भाग आहे, जो साखर, दुग्ध, बँकिंग, वाहतूक आणि ऊर्जा क्षेत्रांमध्ये व्यापक व्यवसाय नेटवर्कसाठी ओळखला जातो. हा समूह विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून ते जनसुराज्य शक्ति पक्षाचे आमदार आहेत, हा पक्ष राज्सयातील सत्तारूढ आघाडीला समर्थन देत आहे. विद्यापीठाला रविवारी मंजुरी मिळाली असली तरी, सरकारने अद्याप नवीन संस्थेची अधिसूचना जारी केलेली नाही. एक अधिसूचना जारी झाल्यानंतर, तीन महाविद्यालयांची शिवाजी विद्यापीठाशी… - [डॉ. सुजित मिणचेकर, राहुल आवाडे शिंदे सेनेच्या वाटेवर!](https://aaplibatmi.news/sujit-minchekar-and-rahul-awade-to-join-shiv-sena-shinde-fraction/): कोल्हापूर : विधानसभा निवडणुका जवळ येत असताना जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संभाव्य लढतींचे चित्र हळूहळू स्पष्ट होत असून कोण नेता कुठल्या पक्षातून उमेदवार असेल या साठी नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहूल आवाडे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. डॉ. मिणचेकर आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्यामध्ये पक्षप्रवेशाबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीसह महाविकास आघाडीला फुटीचे धक्के बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुक नजीक येत असल्याने पक्ष बदलण्याच्या हालचाली वेगाने सुरु आहेत.… - [PM Kisan Yojana: तांत्रिक त्रुटींमुळे अनेक शेतकरी वंचित](https://aaplibatmi.news/large-number-of-farmrs-deprived-off-pm-kisan-yojana/): PM kisan yojana representational image. Aaplibatmi - [शाहुवाडी तालुक्यात रानडुक्करांकडून रताळी पिकाचे नुकसान](https://aaplibatmi.news/wild-boar-destroying-sweet-potato/): पिशवी : शाहुवाडी तालुक्यांत मुसळधार पावसाने ऐकीकडे सोयाबीन,भुईमुग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तर जोमांत असलेल्या रताळी पिकांत रान डुकरांनी हल्ला चढवला असुन कवळ्या रताळी पिकांचे वेल उखडून टाकल्याने ते पुर्णपणे खराब झाले असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वन विभागाने रान डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे .गेल्या काही वर्षांत रताळी पिकांची शाहुवाडी तालुक्यांत मोठया प्रमाणात लागवड केली जात आहे तोडकी मशागत कमी कालखंडात नगदी पैसा देणार पिक म्हणून शेतकरी या पिकाकडे वळले आहेत त्यांत शाहुवाडी वातावरण व तांबडया मातीतील रताळास चांगले उत्पादन मिळत आहे व शहरी बाजार पेठांत चवदार रताळ म्हणून या रताळ्यांना चांगला भाव मिळत आहे त्यांमुळे… ## Pages - [Blog](https://aaplibatmi.news/blog/) - [आपली बातमी : Kolhapur News](https://aaplibatmi.news/): Kolhapur News,आपली बातमी Get the latest Marathi news from Kolhapur Stay updated for kolhapur news on politics, crime, Education, medical, and business news कोल्हापूरच्या बातम्यांसाठी तुमचे पहिले ठिकाण: आपली बातमी डिजीटल Introducing Aapli Batmi Digital, your ultimate source for the latest news from Kolhapur. Stay updated on all the significant local, national, and international news with us at aaplibatmi.news. Your first destination for Kolhapur News: Aapli Batmi Digital. For Kolhapur residents, aaplibatmi.news is your trusted companion to stay updated on the buzzing life of your city. As pioneers in the field of Kolhapur News, we bring you all the important… [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)