उद्योजक व नव-उद्योजकांसाठी दुबई येथे ‘महाबीज’ परिषदेचे आयोजन; कोल्हापुरात ‘रोड शो’!

कोल्हापूर:आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनांचे प्रमोशन व व्यवसायाच्या जागतिकीकरणासाठी (ग्लोबलायझेशन) गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम च्या वतीने

‘महाबिझ परिषदेचे आयोजन दुबई येथे दर दोन वर्षांनी करण्यात येते. महाबिझ 2026 ‘रोड शो’ नुकताच राजश्री शाहू स्मारक भवन येथील मिनी हॉलमध्ये पार पडला.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे अध्यक्षस्थानी होते. तर कोल्हापूर ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात GMBF Global चे आयोजन सचिव . नितीन सासटकर यांच्या माहितीने झाली. GMBF Global चे सरचिटणीस (दुबई) विवेक कोल्हटकर (ज्यांनी बुर्ज खलिफा आणि दुबई मेट्रोच्या कामात सहभाग घेतला आहे) यांनी नवीन देशांमध्ये उद्योगाचा विस्तार करण्यासाठी महाबीज परिषदेची उपयुक्तता सविस्तरपणे स्पष्ट केली. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सरचिटणीस . सुहास फडणीस यांनी संस्थेशी जोडले असल्याचा दहा वर्षांचा अनुभव सांगितला. अध्यक्ष श्री. संजय शेटे यांनी कोल्हापूरच्या उत्पादनांना दुबईत बाजारपेठ मिळवून देण्याची ग्वाही दिली.

‘महाबिझ’ची आंतरराष्ट्रीय परिषद दोन दिवस ३१ जानेवारी २०२६ आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबईतील ‘अटलांटिस द पाम’ या हॉटेलमध्ये होणार आहे.

GMBF Global चे मीडिया प्रमुख दिलीप खेडेकर यांनी आभार प्रदर्शन केले आणि दुबई प्रवासासंबंधी अधिक माहितीसाठी श्री. बळीराम वराडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. जास्तीत जास्त उद्योजकांनी परिषदेसाठी नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Posts

कोंढव्यातील इफ्तार पार्टीला मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

पुण्यात रविवारी मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवकांचा सत्कार समारंभ

— १५ फेब्रुवारी २०२६ च्या मुस्लिम कॉन्फरस मध्ये मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यात येणार —पुणे : महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या वतीने महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

कोंढव्यातील इफ्तार पार्टीला मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

पुण्यात रविवारी मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवकांचा सत्कार समारंभ

झोपडपट्टीचा विकास हाच आमचा खरा संकल्प – आमदार सुनील कांबळे

क्वाड्रंगुलर गोल्फ चषक पुना क्लब गोल्फ ने पटकावला

प्रभाग १७ बाबत कायदेशीर न्याय मिळावा- भरत वाल्हेकर

गोल्फ खेळाडूंनी दिला सामाजिक योगदानाचा आदर्श