Categories: News,

डॉ. सुजित मिणचेकर, राहुल आवाडे शिंदे सेनेच्या वाटेवर!

कोल्हापूर : विधानसभा निवडणुका जवळ येत असताना जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संभाव्य लढतींचे चित्र हळूहळू स्पष्ट होत असून कोण नेता कुठल्या पक्षातून उमेदवार असेल या साठी नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहूल आवाडे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

डॉ. मिणचेकर आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्यामध्ये पक्षप्रवेशाबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीसह महाविकास आघाडीला फुटीचे धक्के बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुक नजीक येत असल्याने पक्ष बदलण्याच्या हालचाली वेगाने सुरु आहेत.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीमधून भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहूल देसाई, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (शरद पवार गट) प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटाचे माजी आमदार के.पी. पाटील महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याच्या विचारात आहेत. ठाकरे गटाचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी महायुतीचे आमदार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठींबा दिला आहे. शिवाय, डॉ. सुजित मिणचेकर देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीचा आणखी एक नेता महायुतीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

राहूल आवाडे यांना मुख्यमंत्र्यांची खुली ऑफर


भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहूल आवाडे इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. पण, भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर देखील इच्छुक आहेत, त्यामुळे भाजपने आवाडे यांच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. लाडकी बहिण योजना सन्मान सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना आवाडे यांनी विमानतळावर त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राहूल आवाडे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली आहे, त्यामुळे भाजपकडून निर्णय होत नसल्यामुळे आवाडे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

आपली बातमी

Recent Posts

पन्हाळगडावरील धर्म कोठी वास्तूत साकारले ऐतिहासिक मुझियम (संग्रालय)

भारतीय पुरातत्व खात्याकडून ऐतिहसिक वास्तूला झळाळीगडकोटांची छायाचित्रे व माहिती पर्यटकांना एकाचा छताखाली संधी रामचंद्र काशीद-पन्हाळा:…

9 months ago

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

मुंबई: भारतीय उद्योगजगताला आज मोठा धक्का बसला आहे, देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन…

9 months ago

Sagar Bagade म्हणाले ‘ मी ही कधी अनाथालयात राहिलो, म्हणूनच घेतले अनाथांना दत्तक

Sagar Bagade यांचे काम प्रेरणादायी: नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक Kolhapur: Sagar Bagade सागर बगाडे…

10 months ago

आता ‘वारणा विद्यापीठ’; महाराष्ट्राच्या पहिल्या क्लस्टर विद्यापीठाला राज्य सरकारची मान्यता

कोल्हापूर : महाराष्ट्र सरकारने शासकीय विद्यापीठांना लहान विद्यापीठांमध्ये विभाजित करण्याच्या धोरणांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगरला राज्यातील…

11 months ago

शाहुवाडी तालुक्यात रानडुक्करांकडून रताळी पिकाचे नुकसान

पिशवी : शाहुवाडी तालुक्यांत मुसळधार पावसाने ऐकीकडे सोयाबीन,भुईमुग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तर जोमांत…

11 months ago