वकृत्व स्पर्धेत उषाराजेची स्वरा वातकर प्रथम

कोल्हापूर : पांडुरंग फिरींगे

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय डॉ. ग. वा. तगारे वक्तृत्व स्पर्धा २०२५ मध्ये उषाराजे हायस्कूल, कोल्हापूरची कु. स्वरा सागर वातकर हिने चमकदार कामगिरी करत मोठा गट (८वी ते १०वी) मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

उत्कृष्ट सादरीकरण, अचूक विषयआकलन आणि प्रभावी मांडणी याच्या जोरावर स्वराने स्पर्धेत उपस्थित परीक्षक व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. जिल्हाभरातील नामांकित शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्वराने प्राविण्य सिद्ध करून उषाराजे हायस्कूलचे नाव उज्ज्वल केले.

या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व स्पर्धेचे आयोजक रोटरी–रोटरॅक्ट क्लब पदाधिकाऱ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Posts

जागतिक दुग्ध परिषदेत ‘गोकुळ’चा आवाज आंतरराष्ट्रीय दूध परिषदेसाठी डॉ. चेतन नरके यांची निवड

कोतोली-पांडुरंग फिरींगे जागतिक दुग्ध व्यवसायाच्या भवितव्यावर मंथन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दूध प्रक्रिया परिषदेत ‘गोकुळ’ दूध संघाचा आवाज घुमणार आहे. ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांची या प्रतिष्ठित परिषदेसाठी निवड झाली असून,…

महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी दुबईत सुवर्णसंधी; ‘महाबीझ २०२६’ जागतिक परिषदेचे आयोजन

मुंबई/दुबई: महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांना जागतिक बाजारपेठेची दारे उघडून देण्यासाठी दुबईतील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यावसायिक नेटवर्किंग संस्था ‘जीएमबीएफ ग्लोबल’ (GMBF Global) सज्ज झाली आहे. येत्या ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

कोंढव्यातील इफ्तार पार्टीला मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

पुण्यात रविवारी मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवकांचा सत्कार समारंभ

झोपडपट्टीचा विकास हाच आमचा खरा संकल्प – आमदार सुनील कांबळे

क्वाड्रंगुलर गोल्फ चषक पुना क्लब गोल्फ ने पटकावला

प्रभाग १७ बाबत कायदेशीर न्याय मिळावा- भरत वाल्हेकर

गोल्फ खेळाडूंनी दिला सामाजिक योगदानाचा आदर्श