Categories: News,Shahuwadi

शाहुवाडी तालुक्यात रानडुक्करांकडून रताळी पिकाचे नुकसान


पिशवी : शाहुवाडी तालुक्यांत मुसळधार पावसाने ऐकीकडे सोयाबीन,भुईमुग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तर जोमांत असलेल्या रताळी पिकांत रान डुकरांनी हल्ला चढवला असुन कवळ्या रताळी पिकांचे वेल उखडून टाकल्याने ते पुर्णपणे खराब झाले असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

वन विभागाने रान डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे .गेल्या काही वर्षांत रताळी पिकांची शाहुवाडी तालुक्यांत मोठया प्रमाणात लागवड केली जात आहे तोडकी मशागत कमी कालखंडात नगदी पैसा देणार पिक म्हणून शेतकरी या पिकाकडे वळले आहेत त्यांत शाहुवाडी वातावरण व तांबडया मातीतील रताळास चांगले उत्पादन मिळत आहे व शहरी बाजार पेठांत चवदार रताळ म्हणून या रताळ्यांना चांगला भाव मिळत आहे त्यांमुळे भात व अन्य पारंपारिक पिका पेक्षा रताळी उत्पादनात मोठी वाढ झाली आहे पण अलीकडे या पिकांच्या मळ्याकडे रानडुकरांनी लक्ष्य केल जात आहे.

रानडुकरांच्या कळपांकडून मळेचेच्या मळे एका रात्रीत फस्त करून टाकले जात आहेत. रताळांचे वेल एकदा उकरुन टाकले की ते परत नापिक होतांत त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होते. त्यांत पावसाने हाहाकार माजवल्यांने रात्रीच्या वेळी राखण करणे जोखमीच झाले आहे. तरी त्वरित वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा व नुकसान झालेल्या पिकांचे भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गांतुन होत आहे.

आपली बातमी

Recent Posts

पन्हाळगडावरील धर्म कोठी वास्तूत साकारले ऐतिहासिक मुझियम (संग्रालय)

भारतीय पुरातत्व खात्याकडून ऐतिहसिक वास्तूला झळाळीगडकोटांची छायाचित्रे व माहिती पर्यटकांना एकाचा छताखाली संधी रामचंद्र काशीद-पन्हाळा:…

9 months ago

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

मुंबई: भारतीय उद्योगजगताला आज मोठा धक्का बसला आहे, देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन…

9 months ago

Sagar Bagade म्हणाले ‘ मी ही कधी अनाथालयात राहिलो, म्हणूनच घेतले अनाथांना दत्तक

Sagar Bagade यांचे काम प्रेरणादायी: नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक Kolhapur: Sagar Bagade सागर बगाडे…

10 months ago

आता ‘वारणा विद्यापीठ’; महाराष्ट्राच्या पहिल्या क्लस्टर विद्यापीठाला राज्य सरकारची मान्यता

कोल्हापूर : महाराष्ट्र सरकारने शासकीय विद्यापीठांना लहान विद्यापीठांमध्ये विभाजित करण्याच्या धोरणांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगरला राज्यातील…

11 months ago

डॉ. सुजित मिणचेकर, राहुल आवाडे शिंदे सेनेच्या वाटेवर!

कोल्हापूर : विधानसभा निवडणुका जवळ येत असताना जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संभाव्य लढतींचे…

11 months ago