क्वाड्रंगुलर गोल्फ चषक पुना क्लब गोल्फ ने पटकावला

IMG 1971

पुणे दि —- अतिशय प्रतिष्ठित अशा क्वाड्रंगुलर गोल्फ टूर्नामेंट 2026 च्या अतीतटीच्या लढतीमध्ये ९७४ स्टेबलफोर्ड गुणांसह अव्वल स्थान पटकावीत पुना क्लब गोल्फ कोर्स ने २०२६ चा क्वांड्रांगुलर चषक पाठविला आहे .या चषकाचे वितरण साउथ कंमाड चे मेजर जनरल संदीप सेठी यांच्या हस्ते पुना गोल्फ कोर्स चे कप्तान इकराम खान यांना आपल्या पूर्ण संघासमवेत प्रदान करण्यात आले .या स्पर्धेत पुणे क्लब गोल्फ कोर्स (PCGC) विजेते,RSI (SSGC) उपविजेता,राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) तिसऱ्या स्थानी तर CME हा संघ चौथ्या क्रमांकावर होते .पुना गोल्फ क्लब 974 ,SSTA(RSI ) 959 , NDA (894) CME (841 या प्रकारे वरील संघाने आपली कामगिरी पार पाडली .
क्वाड्रंगुलर गोल्फ चषकाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते .या स्पर्धेचे सामने RSI गोल्फ कोर्स ,एन डी ए गोल्फ कोर्स आणि सीएमई गोल्फ कोर्स आणि पुना क्लब गोल्फ कोर्स येथे आयोजित करण्यात आले होते .या स्पर्धेला चारही ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पुना गोल्फ क्लब संघाकडून इकराम खान ,इंद्रनील मुजगुले ,कार्तिक कृष्णराज,अजय कपूर ,आदित्य पुसाळकर,नीरज गुलाटी,मोहनिश अडवाणी ,सुशांत खोसला ,सुमेध गांगल ,बीजय लेंका,राज दत्ता ,अवनय खन्ना यांनी अतिशय सुरेख अशा खेळाचे प्रदर्शन दाखवले .सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले .

  • Related Posts

    वंचित,दलित आदिवासी घटकांसाठी मदतीचा उपक्रम: क्षितिज फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

    पुणे दि. — क्षितिज व्हिजन फाउंडेशन हे चॅरिटेबल ट्रस्ट असून वंचित घटकांचे हक्क संरक्षण, सामाजिक आधार आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. समाजातील दुर्बल घटकांना कायदेशीर अडचणींमध्ये योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यांना…

    सर्वधर्म समभाव जपत शहादल बाबा दर्ग्यात इफ्तार पार्टी: वारकरी संप्रदायाचा उत्स्फूर्त सहभाग

    सर्वधर्म समभावाचा संदेश देत येरवडा येथे इफ्तार पार्टी; वारकरी संप्रदायाचा उत्स्फूर्त सहभाग पुणे, दि. — पवित्र रमजान महिन्यानिमित्त येरवडा येथील शहादल बाबा दर्गा येथे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत सर्वधर्म…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वंचित,दलित आदिवासी घटकांसाठी मदतीचा उपक्रम: क्षितिज फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

    सर्वधर्म समभाव जपत शहादल बाबा दर्ग्यात इफ्तार पार्टी: वारकरी संप्रदायाचा उत्स्फूर्त सहभाग

    सर्वधर्म समभावाचा संदेश देत येरवड्यातील शहादल बाबा दर्ग्यात इफ्तार पार्टी

    कोंढव्यातील इफ्तार पार्टीला मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

    पुण्यात रविवारी मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवकांचा सत्कार समारंभ

    झोपडपट्टीचा विकास हाच आमचा खरा संकल्प – आमदार सुनील कांबळे