केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक दयानंद मस्के यांचा नागरी सत्कार व ग्रंथ प्रकाशन सोहळा

पुणे: कवी, चित्रकार, शिल्पकार, लेखक आणि दलित पँथर चळवळीतील ज्येष्ठ नेते तसेच माजी गृहनिर्माण मंत्री दयानंद मसके यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार व ग्रंथ प्रकाशन सोहळा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवार ३१ मे रोजी पुण्यात आयोजीत करण्यात आला आहे .

हा कार्यक्रम रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता औंध येथील भीमसेन जोशी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात दयानंद मसके लिखित ‘वडलांचे व गावगाड्याचे चरित्र’, ‘बाप माझा जगनाथ’, ‘कडव्यापेक्षा जनावरं स्वस्त’ आणि ‘ते दिवस आठवले काही’ या ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

   कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले उपस्थित राहणार असून, आंबेडकरी शाहीर संभाजी भगत यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व लेखक ज. वि. पवार राहणार आहेत.

दयानंद मसके गौरव समिती व मसके कुटुंबीय यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास साहित्य, कला व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

IMG 3214 765x1024

Related Posts

जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाईनी घातला

जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाईने घातला— डॉ.श्रीपाल सबनीस — मानवता धर्म पेरण्याचे काम संतानी केले — डॉ.रंगनाथ पठारेपुणे दि…

Read more
पन्हाळगडावरील धर्म कोठी वास्तूत साकारले ऐतिहासिक मुझियम (संग्रालय)

भारतीय पुरातत्व खात्याकडून ऐतिहसिक वास्तूला झळाळीगडकोटांची छायाचित्रे व माहिती पर्यटकांना एकाचा छताखाली संधी रामचंद्र काशीद-पन्हाळा: पन्हाळगडावरील धर्म कोठी वास्तूत…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक दयानंद मस्के यांचा नागरी सत्कार व ग्रंथ प्रकाशन सोहळा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक दयानंद मस्के यांचा नागरी सत्कार व ग्रंथ प्रकाशन सोहळा

जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाईनी घातला

जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाईनी घातला

व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय संगित महोत्सवात आठ वर्षाची लिशा मतकर करणार भारताचे प्रतिनिधित्व

व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय संगित महोत्सवात आठ वर्षाची लिशा मतकर करणार भारताचे प्रतिनिधित्व

शी कॅन एंड शी विल उपक्रमातून महिला बॉक्सर्स ना नवी झेप

शी कॅन एंड शी विल उपक्रमातून महिला बॉक्सर्स ना नवी झेप

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नगरसेविका हिमाली कांबळे यांनी काढली भव्य मिरवणूक

आंबेडकर जयंतीनिमित्त येरवडा येथे स्नेहभोजन