
भारतीय पुरातत्व खात्याकडून ऐतिहसिक वास्तूला झळाळी
गडकोटांची छायाचित्रे व माहिती पर्यटकांना एकाचा छताखाली संधी
रामचंद्र काशीद-पन्हाळा:
पन्हाळगडावरील धर्म कोठी वास्तूत ऐतिहासिक मुझियम (संग्रालय)साकारले असून भारतीय पुरातत्व खात्याकडून ऐतिहासिक वास्तूला झळाळी दिली आहे.हौशी पर्यटकांना एकाचा छताखाली गडकोटांची छायाचित्रे व माहिती संधी प्राप्त शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पन्हाळगड पर्यटन वैभवात भर पडल्याने इतिहास प्रेमींसह गडवासियांच्यात समधान पसरले आहे.
केंद्र शासनाने भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश या सदराखाली जागतीक वारसा यादीत सामावेशासाठी ‘युनेस्को’ कडे प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावात महाराष्ट्रातील आकरा किल्यांना नामांकित केले आहे. व नामांकित केलेल्या किल्यांमध्ये पन्हाळगडाचा समावेश केला. त्यामुळे पन्हाळगडावर भारतीय पुरातत्व विभागाने ऐतिहासिक इमारतींची डागडुजीची कामे चालू केली.व गडावरील इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक इमारतींचे रूप पालटण्यास सुरवात झाली.व बऱ्यापैकी सुस्थितीत असलेल्या धर्मकोठी डागडुजी केली. व येथे महाराष्ट्रातील किल्यांची तसेच येथील सर्वच ऐतिहासिक इमारतींची माहिती देणाऱ्या दुर्मिळ फोटोसह माहितीचे फलक लावून माहिती संग्रालय चालू केले. त्यामुळे पुन्हा एकदा ही ऐतिहासिक इमारत गत काळाप्रमाणेच माणसांची लगबग अनुभवत आहे. व येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे या इमारतीला गतवैभव प्राप्त झाले आहे.
अलीकडच्या काळात बंद आवस्थेत असलेली धर्मकोठीची इमारतीत संग्रालय पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे वर्दळी मुळे पुन्हा एकदा ही बोलू लागली आहे.ऐतिहासिक धर्माकोठी इमारतीत संग्रालयातील ऐतिहासिक इमारतींची माहिती देणाऱ्या दुर्मिळ फोटोसह माहितीचे फलक पर्यटकांना आकर्षण या वास्तुत पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.
जागतीक वारसा यादीत सामावेशासाठी भारतीय पुरातत्व विभागाने पन्हाळगडावरील ऐतिहासिक इमारतींच्या डागडुजी सुशोभीकरण पन्हाळगडाल गत वैभव प्राप्त होऊ लागले आहे