ट्रॅव्हल एजंट्सच्या समस्यांवर राष्ट्रीय स्तरावर तोडगा काढणार!

कोल्हापूर: ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया (TAAI) साउथ व मध्य महाराष्ट्र या संघटनेची त्रैमासिक सर्वसाधारण सभा नुकतीच कोल्हापुरातील हॉटेल ज्ञीप येथे उत्साहात पार पडली. एअरलाईन्स, हॉटेल इंडस्ट्री, व्हिसा, जीएसटी आणि टीसीएससारख्या ट्रॅव्हल एजंट्सना भेडसावणाऱ्या समस्यांवर राष्ट्रीय स्तरावर तोडगा काढण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

अध्यक्ष मेहबूब शेख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, TAAI ही संस्था ट्रॅव्हल एजंट्सच्या अडचणी थेट भारत सरकार आणि पर्यटन मंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी काम करते.

सेक्रेटरी याजडी मार्कर यांनी उपस्थित एजंट्सना जीएसटी (GST) आणि टीसीएस (TCS) बद्दल महत्त्वाची माहिती दिली. “बिना जीएसटी/टीसीएस असलेला व्यवसाय भविष्यात गुन्हा ठरू शकतो, त्यामुळे सर्वांनी जीएसटीसह व्यवहार करावेत,” असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी व्हिसा, व्हीएफएसला लागणारा विलंब आणि व्हिसा मिळवण्यातील अडचणींवरही सविस्तर माहिती दिली.

TAAI सेंट्रल कमिटीचे सदस्य बहराम झाडेह यांनी एजंट्सचे प्रश्न सेंट्रल बॉडीमार्फत प्रभावीपणे सोडवण्याचे आश्वासन दिले. कोल्हापूर TAAK चे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी सर्व ट्रॅव्हल एजंट्सना राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न सोडवण्यासाठी TAAI ची मेंबरशिप घेण्याचे आणि संघटनेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

या सभेमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्सच्या महत्त्वाची माहिती असेगो ट्रॅव्हल इन्शुरन्सचे एरिया मॅनेजर श्री सावंत यांनी दिली. तसेच, अकासा एअरलाईनचे व्यवस्थापक श्री धुमाळ यांनी आपल्या एअरलाईनच्या देश-विदेशातील नेटवर्कची आणि सोयीसुविधांची माहिती दिली.

यावेळी कोल्हापूर TAAK चे पदाधिकारी, तसेच सांगली व सातारा येथील ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. सेक्रेटरी याजदी साहेब यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

  • Related Posts

    जागतिक दुग्ध परिषदेत ‘गोकुळ’चा आवाज आंतरराष्ट्रीय दूध परिषदेसाठी डॉ. चेतन नरके यांची निवड

    कोतोली-पांडुरंग फिरींगे जागतिक दुग्ध व्यवसायाच्या भवितव्यावर मंथन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दूध प्रक्रिया परिषदेत ‘गोकुळ’ दूध संघाचा आवाज घुमणार आहे. ‘गोकुळ’चे…

    Read more
    महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी दुबईत सुवर्णसंधी; ‘महाबीझ २०२६’ जागतिक परिषदेचे आयोजन

    मुंबई/दुबई: महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांना जागतिक बाजारपेठेची दारे उघडून देण्यासाठी दुबईतील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यावसायिक नेटवर्किंग संस्था ‘जीएमबीएफ ग्लोबल’ (GMBF Global)…

    Read more

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक दयानंद मस्के यांचा नागरी सत्कार व ग्रंथ प्रकाशन सोहळा

    केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक दयानंद मस्के यांचा नागरी सत्कार व ग्रंथ प्रकाशन सोहळा

    जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाईनी घातला

    जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाईनी घातला

    व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय संगित महोत्सवात आठ वर्षाची लिशा मतकर करणार भारताचे प्रतिनिधित्व

    व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय संगित महोत्सवात आठ वर्षाची लिशा मतकर करणार भारताचे प्रतिनिधित्व

    शी कॅन एंड शी विल उपक्रमातून महिला बॉक्सर्स ना नवी झेप

    शी कॅन एंड शी विल उपक्रमातून महिला बॉक्सर्स ना नवी झेप

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नगरसेविका हिमाली कांबळे यांनी काढली भव्य मिरवणूक

    आंबेडकर जयंतीनिमित्त येरवडा येथे स्नेहभोजन