कोतोलीवर शोककळा… ऐन उमेदीत विनायक तुरंबेकर यांचे अकाली निधन

कोतोली | प्रतिनिधी
कोतोली येथील विनायक नामदेव तुरंबेकर यांचे आज पहाटे अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ऐन उमेदीच्या काळात काळाने घाव घातल्याने संपूर्ण कोतोली परिसरावर शोककळा पसरली आहे. ही घटना केवळ एक व्यक्ती गेल्याची नसून, एका हसतमुख, मनमिळाऊ आणि सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या अकाली अस्ताची आहे.
विनायक हे एका संस्थेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. कामातील प्रामाणिकपणा, माणसांशी जोडलेपण आणि मदतीस तत्पर स्वभाव यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. कोणत्याही कार्यक्रमात, सुख-दुःखात ते आवर्जून उपस्थित असत. कालच ते एका शुभ कार्यात सहभागी झाले होते आणि काही तासांतच अशी दुःखद बातमी येईल, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही.
अलीकडच्या काळात तरुण वयातही हृदयविकाराचे झटके येत असल्याच्या घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण असतानाच, विनायक यांच्या निधनाने ही भीती अधिकच गडद झाली आहे. “इतक्या लवकर, इतक्या अचानक…” हे शब्द प्रत्येकाच्या ओठांवर आहेत.
विनायक यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. गावातील चौगुले कुटुंबातील पत्नी असल्याने नातेसंबंधांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण गावावर मोठा दुखवटा पसरला आहे. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात हळहळ आहे.
रक्षाविसर्जन बुधवार दि. ७ जानेवारी रोजी सकाळी कोतोली येथे होणार आहे.
हसरा चेहरा, आपुलकीची भाषा आणि माणुसकीची ओळख मागे ठेवून गेलेला हा तरुण आज कोतोलीच्या आठवणींमध्ये अढळ स्थान घेऊन गेला आहे.
कोतोलीने आज आपला एक जिव्हाळ्याचा माणूस गमावला आहे.

Related Posts

जागतिक दुग्ध परिषदेत ‘गोकुळ’चा आवाज आंतरराष्ट्रीय दूध परिषदेसाठी डॉ. चेतन नरके यांची निवड

कोतोली-पांडुरंग फिरींगे जागतिक दुग्ध व्यवसायाच्या भवितव्यावर मंथन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दूध प्रक्रिया परिषदेत ‘गोकुळ’ दूध संघाचा आवाज घुमणार आहे. ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांची या प्रतिष्ठित परिषदेसाठी निवड झाली असून,…

महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी दुबईत सुवर्णसंधी; ‘महाबीझ २०२६’ जागतिक परिषदेचे आयोजन

मुंबई/दुबई: महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांना जागतिक बाजारपेठेची दारे उघडून देण्यासाठी दुबईतील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यावसायिक नेटवर्किंग संस्था ‘जीएमबीएफ ग्लोबल’ (GMBF Global) सज्ज झाली आहे. येत्या ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

अविनाश बागवे व प्रभाग २२ च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची आज जाहीर सभा

प्रभाग 22 मधील काँग्रेसचे उमेदवार रवी पाटोळे यांच्या निवडून कचेरीच्या उद्घाटन

पुण्यात उदयापासून निर्मायान गोल्फ स्पर्धेचे आयोजन

पुण्यात उदयापासून निर्मायान गोल्फ स्पर्धेचे आयोजन

साप्ताहिक लोह व फॉलिक ॲसिड पूरक आहार कार्यक्रम उंड्री व खोतवाडी शाळांत राबविण्यात आला