शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी विवेकानंद कॉलेजच्या अनुष्का पाटीलची महाराष्ट्र संघात निवड

कोल्हापूर प्रतिनिधी

इंदापूर, पुणे येथे 27 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय 17 वर्षाखालील मुलींच्या शालेय कुराश स्पर्धेत विवेकानंद कॉलेजची अनुष्का अजित पाटील (इयत्ता ११वी, विज्ञान) हिने अतिशय दमदार कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली. तिच्या या उज्ज्वल कामगिरीच्या जोरावर तिची उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली असून कोल्हापूरचा अभिमान आणखी उंचावला आहे.

अनुष्काच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या यशामागे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे व सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे महत्त्वपूर्ण प्रोत्साहन लाभले.

तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस.पी. थोरात, ज्युनिअर जिमखाना प्रमुख प्रा. संतोष कुंडले, जिमखाना प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस.के. धनवडे व सुरेश चरापले यांचेही विशेष मार्गदर्शन तिला मिळाले.

अनुष्काने राष्ट्रीय पातळीवर चमकावी, अशी अपेक्षा महाविद्यालय व संस्थेमार्फत व्यक्त करण्यात आली आहे.

Related Posts

जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाईनी घातला

जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाईने घातला— डॉ.श्रीपाल सबनीस — मानवता धर्म पेरण्याचे काम संतानी केले — डॉ.रंगनाथ पठारेपुणे दि…

Read more
व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय संगित महोत्सवात आठ वर्षाची लिशा मतकर करणार भारताचे प्रतिनिधित्व

पुणे, दि. _ :अत्यंत गुणी आणि आश्वासक अवघ्या आठ वर्षाची संगीतकार लिशा विवेक मतकर हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक दयानंद मस्के यांचा नागरी सत्कार व ग्रंथ प्रकाशन सोहळा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक दयानंद मस्के यांचा नागरी सत्कार व ग्रंथ प्रकाशन सोहळा

जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाईनी घातला

जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाईनी घातला

व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय संगित महोत्सवात आठ वर्षाची लिशा मतकर करणार भारताचे प्रतिनिधित्व

व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय संगित महोत्सवात आठ वर्षाची लिशा मतकर करणार भारताचे प्रतिनिधित्व

शी कॅन एंड शी विल उपक्रमातून महिला बॉक्सर्स ना नवी झेप

शी कॅन एंड शी विल उपक्रमातून महिला बॉक्सर्स ना नवी झेप

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नगरसेविका हिमाली कांबळे यांनी काढली भव्य मिरवणूक

आंबेडकर जयंतीनिमित्त येरवडा येथे स्नेहभोजन